शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांना मातृशोक

मुंबई : शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या मातोश्री विद्या केशव नार्वेकर यांचं वृद्धापकाळाने मुंबईत निधन  झाले आहे. आज दुपारी ३ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत पाली हिल येथील त्यांच्या निवासस्थानी पार्थिवाचे दर्शन घेता येणार आहे. त्यांच्यावर आज संध्याकाळी सांताक्रुझ पश्चिम येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अंत्यसंस्काराला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे इतर नेते उपस्थित राहणार आहेत.

मिलिंद नार्वेकर यांच्या मातोश्रींच्या निधनाचे वृत्त समजताच शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अन्य नेत्यांनी मिलिंद नार्वेकरांचे सांत्वन केले.

दरम्यान, शिंदे गटात गेलेले उदय सामंत यांनी मिलिंद नार्वेकर यांच्या मातोश्रीच्या निधनावर शोक व्यक्त केला. “शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या मातोश्रींचे निधन झाल्याची बातमी कळली.. मिलिंदजींचे त्यांच्या आईवर अतोनात प्रेम होते, त्यांच्या जीवनात मातृप्रेमाची पोकळी निर्माण झाली आहे ती कधीही भरून न येणारी आहे. त्यांना हे दुःख सहन करणयाची ताकद ईश्वराने द्यावी” असं ट्विट उदय सामंत यांनी केलं आहे.

Share