औरंगाबाद : शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. लोकसभा निवडणुकीत भाजपकडून आंबेडकर यांनी करोडो रुपये घेतल्याचा आरोप चंद्रकांत खैरे यांनी केला होता. चंद्रकांत खैरे यांनी केलेल्या या आरोपानंतर वंचित बहुजन आघाडी चांगली आक्रमक झाली होती. सदर वक्तव्यावर चंद्रकांत खैरे यांनी माफी मागावी अन्यथा काळे फासण्याचा इशारा वंचित बहूजन आघाडीकडून देण्यात आला होता. त्यानंतर आता खैरे यांनी एक पाऊल मागे घेत प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल केलेलं विधान आपण परत घेत असल्याचं म्हटल आहे.
चंद्रकांत खैरे यांनी पत्रात काय म्हटलं?
वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांना पाठवलेल्या पत्रात चंद्रकात खैरे यांनी लिहिलं आहे की, “जालना इथे चार दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात भाजपने एमआयएम आणि वचितचा एक हजार कोटी रुपये दिल्याचं वक्तव्य केलं होतं. परंतु मी हे वक्तव्य एमआयएमला उद्देशून केलं होतं. यात वंचित बहुजन आघाडीचं नाव मी अनावधानाने घेतलं. वंचितबाबत मी हे वक्तव्य मागे घेत आहे. माझं वक्तव्य एमआयएमसाठी होतं, ते कायम आहे. वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या भावना दुखावण्याचा माझा उद्देश नव्हता.
राजकीय विरोधकांनी भान ठेवून बोलावं : सिद्धार्थ मोकळे
“वंचित बहुजन आघाडीचे चारित्र्य स्वच्छ आहे. त्यावर कोणीही शिंतोडे उडवू शकत नाही. खोटे आरोप करुन पक्षाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला तर कायदेशीर कारवाई करण्याची भूमिका वंचित बहुजन आघाडीने घेतली आहे. त्यामुळे राजकीय विरोधकांनी बोलताना भान ठेवून बोलावं, असं वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष आणि प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी म्हटलं