म्हातारपणातले अल्पसे टुल्ल् किट्ट….!!

TOOL KIT

जनमानसात वावरत असताना समिकरण हि नेहमीच सारखी नसतात, किंबाहूना ती काळानुरुप बदलावी लागतात. परंतू तत्व बाळगणारी या समीकरणांशी समरुप होतील किंवा कसे हा ही निश्चितच वादातीत मुद्दा होऊ शकतो.

सन २०१० च्या पुर्वी सेवानिवृत्त झालेली प्रशासन सेवेतील अधिकारी लोकांनी, साहेबांच्या खाक्यातील आयुष्य, तामझाम, प्रोटॉकॉल, निम्म स्तरारील अधिकारी कर्मचारी यांच्या समवेत बोलण्या वागण्या मध्ये ठेवलेले अंतर, आणि आज मितीस कार्यरत अधिकारी यांचा याबाबतीतील स्तर हा एक तुलनात्मक अभ्यासाचा विषय होऊ शकतो. निजामीत वाढलेली ही पिढी आजमितीस देखील अस्तित्वात आहे. कॉँग्रेसी स्वरुप असलेले प्रशासन ज्या ज्या अधिकारी संवर्गाने उपभोगले, त्यांना त्यांना त्यांच्या कारकिर्द म्हणजे सोनरी कारकीर्द असल्याचा सतत सातत्याने भास होत असतो. आणि अशा भासात असताना त्यांना आजच्या राजकीय, प्रशासनिक स्थितीवर भाष्य करताना हातच न राखता, हाणता येईल तितक ते हाणित, मारीत सुटतात.

ज्युलिओ रिबेरो यांच्या बदल हा देश जाणतो, ते एक उत्कृष्ट प्रशासनीक पोलीस अधिकारी सुपरकॉप च्या प्रतिमेत ३६ वर्षे प्रदिर्घ सेवेत वावरले. त्यांना अनेक राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त आहेत. याच कॉप ने आपल्या या प्रदिर्घ कालावधीवर आत्मचरित्र लिहील- बुलेट फॉर बुलेट. त्यात त्यांनी पुर्वजांच्या धर्मपरिवर्तनावर देखील प्रांजल भाष्य केल आहे. त्यांच्या पुर्वजांचा ओघवता इतिहास, वडिलांचे संस्कार, यावर देखील भाष्य आहे. मुद्दा हा त्यांच्या पुस्तकाचे परिक्षण करने हा नसुन, एका तत्वनिष्ट विचारांचे समीकरण बदलाण्याचा मोह कसा होत जातो याबद्दलच निरिक्षण नोंदवावे असा हा प्रयत्न आहे.

सत्तेतील लोकांच्या विचारावर आपल अधिराज्य असावं अशा काहीशा न बदलणाऱ्या समिकरणाच्या बोरू बहाद्दर वृत्तपत्रात रिबेरो साहेंबांनी एक डाव्यास्तरीय विचारसाराला खतपाणी घालण्यासाठी, तत्वांना मुरड घालीत, लेखक अल्पा शाह यांच्या, “द इनकार्सरेशन्स: बीके-16 अँण्ड द सर्च फॉर डेमॉक्रसी इन इंडीया” या पुस्तकावरील परिक्षणात, स्वतःची तत्व बदलली असाल्याचे प्रकर्षाने जाणवते. अल्पा शाह मॅडम (अल्पशाबाई म्हणता येत नाही) (आणि याच त्या बालाजी टेलीफिल्म मधील एकता कंपनीत महाभारत बिघडविणाऱ्या संचालीका) यांचे वयाच्या 15 व्या वर्षापासून वास्तव्य साहेबांच्या देशात. तिथेच त्यांच्यावर साहेबी संस्कार झाले. तशा त्या मुळच्या गुजराती. अनावधानाने म्हणा किंवा वाण नाय ते गुण म्हणा,साहेबांची तोडो फोडो वाली माणसिकता यांच्यात उतरलीच आणि मानववंशशास्त्रातील प्राध्यापीका म्हणून ओळख निर्माण केली. देशात साहेबांच्या देशात काही लिहील गेलं, मग ते उजव असो डाव असो, त्याची रीग इकडे ओडणारी लाईनत उभेच आहेत. रिबेरो साहेब देखील याच लाईनतले. त्यांनी मॅडेम च्या विचारांना उच्च दर्जाचे ठरवत, आज मितीस कार्यरत कॉप (पोलीस विभागातील असो वा न्यायदान संस्थेतील) कसे दोषी आहेत, याचा परिपाठ रंगवला आहे. मॅकॉलोच्या देशात अजून काय काय पैदा होणार, आणि इकडील वाण त्याला कशा पध्दतीने रंगवणार हे देवजाणो.

रिबेरो साहेबांच्या प्रतिमेला हात लावण्या इतकी लायकी नाही. परंतू ज्यावेळेस एककल्ली बाजू असते ना त्यावेळेस त्यातून कुबट वास येतोच. संघाला बदडले, की आपणच सर्वांचे तारणहार आहोत अशा भाव सुपरकॉप बाळगूण आहेत. संघ हा या देशात मोठा राक्षस आहे, त्यांच्यापासून वाचविण्यासाठी सुपरकॉपची निर्मिती झाली आहे, अशी हॉलीवुड मानसिकता बाळगीत साहेबांच लिखाण झाल आहे.

शिख आंदोलनात (अतिरेकी संबोधल्या गेलेल )त्यावेळेस रिबेरो साहेबांच हे समिकरण कुठ गुंडाळून ठेवल होत, याचा शोध घेणे देखील तितकच आवश्यक आहे. त्यांच्याच आत्मचरित्रा मध्ये त्यांच्या वरिष्ठांनी त्यांच्या गोपनीय अहवालात त्यांच्या समीकरण वेळोवेळी बदलण्यामुळे स्वभावाबद्दल नोंदी करुन ठेवल्या आहेत. त्या त्यांना त्यांच्यावर अन्यायकारक असल्याचा साक्षात्कार देखील झाला आहे. हम करे सो कायदा, या मानसिकतेत असलेले रिबेरो यांच्याकडून अजुन काय ते अपेक्षित असणार. बर ज्या १६ -१५ बद्दल लिहील आहे, त्यांना खरच का हो दलीतांचा कळवळा. बर अर्ध्याच्या वर ख्रिश्चन मशनरी वाली. उद्देश सफल झाला नाही म्हणून संघवाल्यांच्या विरोधात पेरणी. रिबेरो साहेब, आपल्या कारकर्दीत जशी क्रिकेट खेळताना बॉल मुळे खिडकीच्या काचा फोडणाऱ्या तुम्हाला, क्रिकेटचा परिपाठ देणारा भायखळ्यातील अधिकारी आवडाला. पण तो तुमच्या वागणूकीत रुजला नसावा. आपण याच अल्पा (अल्पशा) मॅडम ला नागरीकशास्त्राचे धडे दिले असते तर निश्चीतच बर झाल असत. भिमा कोरेगाव (कोरेगाव भिमा) या प्रकरणात आपण एकच बाजू मांडली. आपण जर कोरेगाव भिमा येथील जमादार यांच्या पुस्तकाचा अभ्यास केला असता, आणि ती बाजू देखील यासोबत लेखीकाने अभ्यासावी असे निरीक्षण नोंदविले असते,तर आपल्या हेतू बद्दल वाचकांच्या संशयाला शिरकाव लाभला नसता.

भिमा कोरेगाव (कोरेगाव भिमा) हा काही त्या खाणीमुळे बाधीत शेतकऱ्यांसारखा प्रश्न मुळीच नव्हता. किंवा कुठल्या विकासात्मक प्रोजेक्ट मुळे बाधीत होणाऱ्या शेतकऱ्यांचा देखील विषय नव्हता. कोरेगांव भिमा आणि डाव्यांचा विरोध असलेली धरणे, खाणकाम, बाधीत शेतकरी, मजूर, स्थानिक रहिवाशी यांची सांगड घालण्याची गरज पुस्तकासंबंधाने लिहीताना करण्याचा अट्टाहास का रिबेरो साहेब?  विषयांची सांगड घालण्याचे हरवलेल कसब कदाचीत आपण गमावून बसला आहात. डाव्यांचा जिहाद जग जाहिर आहेच. यात त्या योगेंद्र यादव सारखी विखारी जमात सोबतीला असल्यावर, पाहणे नको. लोकसभा निवडणूकीकरीता वारेमाप टुलकिटचा वापर केलाच आहे. आता महाराष्ट्रात येऊ घातलेल्या निवडणूकांकरीता तोच प्रयोग रिबोरो साहेब करताना अनुभवयास येत आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने आणि सर्व महापुरुषांच्या आशीर्वादाने “१ जानेवारी १८१८ – कोरेगाव भीमा लढाईचे वास्तव ”  तिसरे इंग्रज-मराठा युद्ध व कोरेगाव भीमाच्या या लढाईचे तत्कालीन अस्सल संदर्भ, कागदपत्र उपलब्ध आहेत. या सर्व संदर्भाच्या अभ्यासातून, ही लढाई जातीअंताची लढाई नव्हती असे कळून येते. तर प्रत्यक्षात ही लढाई तत्कालीन राजकारणासाठी आणि सत्ताकारणासाठी झाली. १ जानेवारी १८१८ रोजी कोरेगाव भीमाची लढाई चालू असताना स्वतः सातारचे छत्रपती प्रतापसिंह भोसले हे दुसरे बाजीराव पेशवे यांसह फौजेसोबत होते.इंग्रजी सैन्यात विविध जाती धर्माचे सैनिक होते तसेच मराठा सैन्यातही विविध जाती धर्माचे सैनिक होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनीही कोरेगावच्या युद्धास जातीअंताची लढाई कधीच म्हटलेले नाही. याउलट जातीवादी कारणांमुळे महार बांधवाना इंग्रजांनी आपल्या सैन्यात प्रवेश बंदी केली म्हणून १ जानेवारी १९२७ रोजी कोरेगाव लढाईच्या स्मरणार्थ इंग्रजांनी बांधलेल्या जयस्तंभ परिसरात सभा घेऊन इंग्रजांच्या विरोधात आंदोलन पुकारले. याशिवाय या लढाईचे अनेकविध पैलू या पुस्तकातून उलगडण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे.ॲडव्होकेट रोहन बाळासाहेब जमादार माळवदकर (१ जानेवारी १८१८ कोरेगाव-भीमा लढाईतील शौर्यवीर आणि जयस्तंभाचे इनचार्ज खंडोजी जमादार माळवदकर यांचे ७वे वंशज) यांनी हे पुस्तक लिहीले असून त्यांच्याच पुस्तकातला सारांश या ठिकाणी रिबेरो साहेंबांना वाचण्यात यावे व पुस्तक वाचण्याची उपरती त्यांना व्हावी येवढाच या मागचा उद्देश. “अल्पसे” टुलकीट घेवून देश बिघडविण्याचा धंदा वाढीस न लागावा, जनमानसात खटाखट वृत्ती वाढीस न लागावी, चांगल व वाईट याचा शोध घेण्याची माणसिकता वाढावी, विधानसभा निवडणूकात अशा अल्पशा टुलकीट ला बळी न पडता, मतदाराने जागृत राहावे, या करीताचा हा लेख प्रपंच. रिबेरो साहेब आपण हा उदयोग केला नसता तर निश्चितच सुपरकॉप म्हणून अनंत काळासाठी आठवणीत राहिला असतात. आपणच आपल्या प्रतिमेला काळ फासवुण घेताना होणारा माणसिक त्रास निश्चितच अवघड असणार. वाहत पाणी अडत जाताना गढुळ होत जात. ते कदाचीत असच असाव.

Share