सरकारच्या गलथान कारभारामुळे लाखो लोकांचे प्राण गेले; राहुल गांधींचा मोदी सरकारवर गंभीर आरोप

नवी दिल्ली : कॉंग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधींनी कोरोना रुग्णसंख्येवरुन मोदी सरकारवर पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत. सरकारच्या गलथान कारभारामुळे करोना काळात ४० लाख लोकांनी आपले प्राण गमावले, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. तसंच मृतांच्या नातेवाईकांना चार लाख रुपयांची भरपाई देण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

कोरोनाबळींचा नेमका आकडा सार्वजनिक करण्याच्या जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रयत्नात भारत अडसर ठरत असल्याचा दावा ‘न्यूयॉर्क टाइम्स’मधील एका रिपोर्टमधून करण्यात आला आहे. हा रिपोर्ट ट्विटर हँडलवर शेअर करत राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

 

Share