मंत्री एकनाथ शिंदेंना कोरोनाची लागण

मुंबई : राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. राज्यातील जवळपास २० मंत्री आणि २० पेक्षा जास्त राजकीय नेते कोरोनाबाधित झाले आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल दिली होती. आज आणखी एका मंत्र्याची भर पडली आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण झाली आहे. ट्विट करऊन दिली माहिती.

एकनाथ शिंदे म्हणाले की, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली वैद्यकीय उपचार सुरू आहेत. आपणां सर्वांच्या आशीर्वादाने कोरोनावर मात करून लवकरच मी आपल्या सेवेकरीता हजर होईन. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी काळजी घ्यावी व लक्षणे दिसल्यास तात्काळ कोरोना चाचणी करावी, असे ट्विट एकनाथ शिंदे यांनी केले.

या नेत्यांना कोरोनाची लागण
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात
शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड
आदिवासी मंत्री के. सी. पाडवी
ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे
महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर
खा. सुप्रिया सुळे
आ. सागर मेघे
आ. राधाकृष्ण विखे पाटील
आ. शेखर निकम
आ. इंद्रनील नाईक
आ. चंद्रकांत पाटील (मुक्ताईनगर)
आ. माधुरी मिसाळ
माजी मंत्री दिपक सावंत
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील
माजी मंत्री पंकजा मुंडे
आ. धीरज देशमुख
आ. रोहित पवार

 

Share