मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात भुमिका घेतली. तसेच मशिदींवरील भोंगे उतरवले नाहीत तर ४ मे पासून मशिदींसमोर हनुमान चालिसाचे पठन करण्याचा इशारा दिला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पोलिसांकडून आता मनसेच्या कार्यकर्त्यांवर कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आली असून, मनसेचे चांदीवली विभाग अध्यक्ष महेंद्र भानुशाली यांना अटक करण्यात आली आहे. भानुशाली यांच्या कार्यालयातून पोलिसांनी भोंगे जप्त केले आहेत.
#WATCH | Maharashtra: Mumbai Police seize loudspeakers from MNS office and detain party's Chandivali unit chief Mahendra Bhanushali and others. pic.twitter.com/irR9Y9nQJ6
— ANI (@ANI) May 3, 2022
राज ठाकरेंवर औरंगाबादेत गुन्हा दाखल
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात औरंगाबादेतील सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिटीचौक पोलीस स्टेशनचे पोलीस उप निरीक्षक गजानान इंगळे यांनी फिर्याद नोंदवली आहे. त्यानुसार राज ठाकरे, राजीव जेवळीकर व इतर आयोजकांविरोधात गुरन -१२७/२०२२ कलम ११६,११७,१५३ भादवि १९७३ सह कलम १३५ महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ सुधारीत ३१ जुलै २०१७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आल आहे.