काँग्रेसच्या माजी केंद्रीय मंत्र्याचा राजीनामा !

उत्तरप्रदेश- उत्तर प्रदेशात १० फेब्रुवारी रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. त्यासाठी सर्व पक्षांनी उमेदवार जाहीर केले आहेत. राजकीय उलथापालथ होत असताना राजकीय पक्षांनी निवडणूक जिंकण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावली आहे. नेत्यांचे पक्ष बदलण्याची प्रक्रियाही जोरदार सुरू आहे. यातच काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री आरपीएन सिंह यांनी काँग्रेसचा राजीनामा देत भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.

आरपीएन सिंह यांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर ट्विट केले आहे . त्यांनी ट्विटमध्ये म्हंटल आहे की, आज जेव्हा संपूर्ण देश प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे, तेव्हा मी माझ्या राजकीय जीवनात एक नवीन अध्याय सुरू करत आहे.

सिंह यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपल्या ट्विटर प्रोफाइलवरून काँग्रेसचे नाव आणि संबंधित पोस्टही काढून टाकल्या आहेत. स्वामी प्रसाद मौर्य यांच्या विरोधात आरपीएन भाजपकडून निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

 

Share