राऊतांना ताकाळ राज्यसभेतून निलंबित करा – तुषार भोसले

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी  काल  पत्रकार परिषद घेत भाजपवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या या आरोपानंतर आता भाजपकडून देखील प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. भाजपाचे आध्यात्मिक आघाडी प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी शिवसेना खा. संजय राऊत यांनी राज्यसभेतुन निलंबित करा अशी उपराष्ट्रपती वेंकैय्या नायडू यांना पत्र लिहुन मागणी केली आहे.

पत्रात आचार्य भोसले म्हणतात, पत्रकार परिषदेतुन खुलेआम शीवीगाळ करणारे शिवसेना खासदार संजय राऊत साधु-संतांनी घडवलेल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीला कलंक आहेत. वेळोवेळी खालच्या दर्जाची भाषा वापरणाऱ्या संजय राऊतांना राज्यसभा सदस्य, या संवैधानिक पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही, त्यामुळे त्यांना तात्काळ निलंबित करावे, अशी विनंती भोसले यांनी केली आहे.

Share