मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे आता पदमुक्त होण्याच्या चर्चा सुरु आहेत. राज्यपालांनी स्वतःच आपल्याला पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केल्याची माहिती समोर येत आहे. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
संजय राऊत आपल्या ट्विट मध्ये म्हणतात, “राज्यपाल महोदयांनी पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली! ग्रेट. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमाना विरोधात शिवसेनेने महाराष्ट्र बंदचे संकेत देताच पळापळ झालेली दिसते. तरीही महाराष्ट्राच्या शत्रूंशी लढाई सुरूच राहील! राजभवनाची खिंड पडली. आवाज शिवसेनेचाच! जय महाराष्ट्र!,” असं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे.
राज्यपाल महोदयांनी पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली! ग्रेट. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमाना विरोधात शिवसेनेने महाराष्ट्र बंदचे संकेत देताच पळापळ झालेली दिसते. तरीही महाराष्ट्राच्या शत्रूंशी लढाई सुरूच राहील! राजभवनाची खिंड पडली.आवाज शिवसेनेचाच!
जय महाराष्ट्र! pic.twitter.com/MK1rWbhzcA— Sanjay Raut (@rautsanjay61) November 28, 2022