राज्यपाल महोदयांनी पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली! ग्रेट

मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे आता पदमुक्त होण्याच्या चर्चा सुरु आहेत. राज्यपालांनी स्वतःच आपल्याला पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केल्याची माहिती समोर येत आहे. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

संजय राऊत आपल्या ट्विट मध्ये म्हणतात, “राज्यपाल महोदयांनी पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली! ग्रेट. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमाना विरोधात शिवसेनेने महाराष्ट्र बंदचे संकेत देताच पळापळ झालेली दिसते. तरीही महाराष्ट्राच्या शत्रूंशी लढाई सुरूच राहील! राजभवनाची खिंड पडली. आवाज शिवसेनेचाच! जय महाराष्ट्र!,” असं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे.

राज्यपाल कोश्यारी काय म्हटले होते?
औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ६२ व्या दीक्षान्त समारंभात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आपल्या भाषणात म्हटले की, शिवाजी महाराज तर जुने युगाचे हिरो, डॉ. आंबेडकरांपासून तर डॉ. गडकरीपर्यंत नवीन युगाचे हिरो आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज यांना जुन्या युगाचे नायक म्हटल्याने वाद निर्माण झाला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी राज्यपालांना माघारी पाठवण्याबाबत राज्य सरकारने निर्णय घ्यावा असे म्हटले आहे. त्यांनी या मुद्यावरून भाजपवरही टीका केली.

Share