Mukta Tilak Passed Away: भाजप आमदार मुक्ता टिळक यांचं निधन

पुणे : पुण्यातील कसबा पेठ मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांचं निधन झालं आहे. त्या ५७ वर्षांच्या होत्या. मागील काही दिवसांपासून त्या कर्करोगाने आजारी होत्या. अखेर आज पुण्यातील गॅलेक्सी केअर रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. उद्या (शुक्रवारी) सकाळी ९.०० ते ११.०० या वेळेत त्यांचं पार्थिव केसरी वाडा या राहत्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी ११ वाजता वैकुंठ स्मशामभुमी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

कोण आहेत मुक्ता टिळक?
भाजपच्या एकनिष्ठ कार्यकर्त्या अशी मुक्ता टिळक यांची ओळख आहे. मुक्ता टिळक या २०१७ ते २०१९ या काळात भाजपच्या पुणे महापालिकेच्या महापौर होत्या. त्यानंतर त्यांना २०१९ साली भाजपच्या वतीने विधानसभेचं टिकीट देण्यात आलं. त्या कसबा पेठ मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेल्या. कर्करोगासारख्या दुर्धर आजाराचा सामना करत असताना देखील त्यांनी व्हिलचेअरवर मुंबईत येत विधान परिषदेसाठी मतदान केलं होतं. त्यावेळी भाजपच्या सर्वच नेत्यांकडून त्याचं कौतुक करण्यात आलं. त्या लोकमान्य टिळकांचे पणतू शैलेश टिळक यांच्या पत्नी आहेत.

Share