मुंबई महानगरपालिकेवर प्रशासक नेमणार

मुंबई : महाविकास आघाडी सरकारने मोठा निर्णय घेतलाय. मुं बई महापालिकेची निवडणूक तोंडावर आलेली असताना महानगरपालिकेवर  प्रशासक नेमणार, असल्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम पुढे ढकलला जाण्याची शक्यता आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेची मुदत ७ मार्च २०२२ रोजी संपत आहे. परंतू, राज्यात कोविडची आपत्ती त्याचप्रमाणे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सदस्य संख्येत केलेली वाढ आणि त्यामुळे झालेली प्रभागांची पुनर्रचना यामुळे ही निवडणूक घेणे शक्य होणार नसल्याने प्रशासक नियुक्ती करण्याची सूचना राज्य निवडणूक आयोगाने केली होती.

सद्यस्थितीत प्रशासक नियुक्तीबाबत मुंबई महानगरपालिका अधिनियम १९८८मध्ये कोणतीही तरतूद नाही, त्यामुळे ही सुधारणा करण्यासाठी अध्यादेश प्रख्यापित करण्यात येईल. प्रशासकाची नियुक्ती ही आगामी सार्वत्रिक निवडणुकीनंतर होणाऱ्या महानगरपालिकेच्या पहिल्या सभेच्या दिनांकापर्यंत लागू राहणार आहे.

Share