मुंबई महापालिकेचा ३३७० कोटी रुपयांचा शिक्षण अर्थसंकल्प सादर

 मुंबई मुंबई महापालिका निवडणूक तोंडावर आली असताना आज पालिकेचा अर्थसंकल्प सादर  झाला आहे. गेल्या वर्षी ३९ हजार कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. यंदाच्या सन २०२२ – २३ च्या अर्थसंकल्पाच आकारमान वाढण्याची शक्यता आहे. अशातच मुंबई महापालिकेचा शैक्षणिक अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. मुंबई महापालिकेचा ३३७० कोटी रुपयांचा शिक्षण अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे.

कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सुरु करण्यात आलेल्या ऑनलाईन शिक्षणाचे पडसाद या अर्थसंकल्पावर झाल्याचं दिसून येत आहे. मुंबई महापालिका शाळांच्या वर्ग खोल्या डिजिटल करण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला असून त्यासाठी या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. पालिका शाळांच्या २,५१४ वर्ग खोल्या डिजीटल होणार आहेत.

मुंबई महापालिका शैक्षणिक अर्थसंकल्पातील मुद्दे

  • मुंबई महापालिकेचे यंदाच्या वर्षीचे शिक्षण बजेट : ३३७० कोटी
  • थिंकींग लॅबसाठी : २९ लॅब
  • व्हर्च्युअल ट्रेंनींग सेंटरसाठी : ३८ कोटी २ लाख
  • शाळा इमारतींची दुरुस्ती, पुर्नबांधणी : ४१९ कोटी
  • शाळांची देखभाल- स्वच्छतेसाठी : ७५ कोटी
  • टॅब योजनेसाठी : ७ कोटी
  • यंदा केंब्रिज विद्यापिठाशी संलग्नित आयजीएससी आणि आयबी शाळांची उभारणी होणार, या नव्या २ शाळांकरता १५ कोटीची तरतुद
  • खगोलशास्त्रीय प्रयेगशाळांकरता : ७५ लाख
  • खाजगी प्राथमिक शळांना महारालिकेकडून अनुदान : ४१४ कोटी
  • सध्या CBSC च्या ११ आणि आयसीएससी बोर्डाची १ अशा एकूण १२ शाळा मुंबईत सुरु आहेत
  • मुंबई महापालिका शिक्षण बजेटवर आदित्य ठाकरेंच्या पर्यावरण विभागाचा ठसा
  • मुंबई महापालिकेच्या विद्यार्थ्यांना जंगल सफारी, निसर्ग उद्यान,अभयारण्यांना भेटी घडवणार : तरतुद ३१ लाख
  • शाळांच्या अग्निशमन यंत्रणेकरता : २.६४ कोटींची तरतुद
  • महापालिका शालेय विद्यार्थ्यांना मोफत बेस्ट बस पास करता : ४.२५ कोटी
  • महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तुंचा मोफत पुरवठ्यासाठी : १०० कोटी
Share