ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊत यांचा सवाल,कुछ मिला क्या?

मुंबई- संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना काल ईडीने अटक केली. १ हजार ३४ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. तसेच प्रवीण राऊत यांच्या पत्नीने संजय राऊत यांच्या पत्नीला ५५ लाख रुपये दिले होते. यावर आज संजय राऊत यांनी कुछ मिला क्या अशी  माध्यमांमध्ये प्रतिक्रिया दिली.

पुढे ते म्हणाले की, “या सरकारमध्ये विरोधकांचे नातेवाईक यांच्यावर कारवाई होत असतात आणि आमच्या सारखे लोक नेहमी सहन करत असतात. २०२४ पर्यंत आम्ही हे सहन करु. राजकीय सुड बुद्धीच्या या कारवाया होत आहेत. त्यांचा तपास आमच्याभोवती सुरु आहे. मी त्यांना विचारतो कुछ मिला क्या?. हा एक खेळ सुरु आहे,”अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.

Share