मुंबईचा दादा आम्हीच म्हणणाऱ्यांची दादागिरी मुंबईकर उतरवेल

मुंबई-मुंबईचा दादा आम्हीच असे सांगणाऱ्यांची दादागिरी आणि माज आता मुंबईकर जनताच उतरवेल, अशी टीका भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केली आहे. संजय राऊत यांनी मुंबई फक्त शिवसेनेची आणि भाजप नेत्यांच्या घरात  घुसण्याबाबत केलेल्या वक्तव्यावर वाघ बोलत होत्या.

आम्ही घरात घुसलो तर भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना नागपूरलाही जाता येणार नाही, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले होते. त्यावरून भाजपाच्या नेत्यांनी खासदार राऊत यांच्यावर चौफेर हल्ला चढवला आहे.भाजपाचे आमदार अमित साटम यांनी खासदार राऊत यांना थेट इशारा दिला आहे. मुंबई तुमची जहागिरी नाही, असे म्हणत घरात घुसायची भाषा करणाऱ्या राऊत यांना त्यांच्या घरात किती किंमत आहे हे आम्हाला चांगलं माहित आहे, असे आमदार साटम यांनी म्हटलं आहे.

तर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी संजय राऊत यांना सवाल करत मुंबईचा ७/१२ काय नावावर केला की काय असं विचारत टिका केली आहे. तसेच मुंबईकरांचे आपण अजून किती मनोरंजन करणार आहात असा त्यांनी प्रतिप्रश्न देखील विचारला आहे. त्याच बरोबर मुंबईचा दादा तुम्ही आहात असं तुम्हाला बोलून दोखवाव लागताय यात फार मोठी शोकांतिका आहे, आणि मुंबईचा दादा आम्हीच म्हणणाऱ्यांची दादागिरी मुंबईकर आता आगामी निवडणूकीत चांगलीच काढतील अश्या शब्दात चित्रा वाघ यांनी टिका करत संजय राऊत यांना खडेबोल सुनावले आहेत.

Share