हातपाय बांधुन केलेल्या मारहाणीत युवकाचा खुन, घटनेचा व्हिडीओ व्हायरल

औरंगाबाद : शहरातील टीव्ही सेंटर जवळील शताब्दी नगर परिसरात असलेल्या माजी नगरसेवक यांच्याकडे मंडप आणि डेकोरेटरच्या कामाला असलेल्या युवकास टीव्ही सेंटर परिसरात बेदम मारहाण करुन त्याची हत्या झाल्याची घटना आज उघडकीस आली आहे.

मनोज शेषराव आव्हाड असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. लॉनच्या परिसरातील लाइट चोरल्याच्या संशयावरून मृत तरुणाला मारहाण झाल्याचे समोर आले आहे. लाइटींग चोरी केल्याच्या संशयावरून चार-पाच जणांनी त्याचे हात-पाय बांधून हातातील काठ्याने बेदम मारहाण केली. त्याला मारहाण करतानाचा व्हिडिओही मोबाइलमध्ये शूट केला गेला, अशी माहिती आहे. मनोजला झालेल्या बेदम मारहाणीनंतर त्याला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच सिडको पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे.

Share