भारतीय नौदलाची ताकद ‘वागशीर’ पाणबुडी वाढवणार

अत्याधुनिक तंत्रज्ञाना परिपूर्ण माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडच्या ‘वागशीर’ या पाणबुडीला आज लॉन्च करण्यात आल. वागशीर ही  पाणबुडी कमी किरणोत्सारी आवाज पातळी, विशिष्ट हायड्रो डायनॅमिकल आकार असलेली स्कॉर्पिन वर्गातील सहावी पाणबुडी आहे. वागशीर ‘जलावतरण’ कार्यक्रमात लॉंच करण्यात आली, याप्रसंगी डिफेन्स सिक्रेटरी डॉ. अजय कुमार शर्मा यांची मुख्य उपस्थिती होती.

प्रकल्प-७५ अंतर्गत भारताला ३० वर्षात २४ पाणबुड्या बांधायच्या होत्या, त्यापैकी १८  पारंपारिक आणि ६ अणुशक्तीवर चालणाऱ्या पाणबुड्या होत्या. २००५ मध्ये, भारत आणि फ्रान्सने ६ स्कॉर्पीन-क्लास पाणबुड्या बांधण्यासाठी ३.७५ अब्ज डॉलर करारावर स्वाक्षरी केली. त्याच स्कॉर्पीन-क्लास वर्गातल ‘वागशीर’ ही शेवटची पाणबुडी आहे

वागशीर लॉन्च झाल्यानंतर १ वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक काळासाठी टेस्टिंग आणि ट्रायलसाठी जाणार आहे. ही पाणबुडी सायलेंट किलर म्हणून ओळखली जाईल, वागशीरच्या टेस्टींग आणि ट्रायलनंतर भारतीय नौदलात सामील होईल. विशेष म्हणजे रडारमध्ये ही पाणबुडी टिपली जात नाही. या पाणबुडीची लांबी ६७.५ मीटर तर उंची १२.३  मीटर आहे. इतकच नाही तर ही पाणबुडी ३५० मीटरपर्यंत समुद्रात खोलवर जाऊ शकते. शिवाय पंचेचाळीस ते पन्नास दिवस ही पाणबुडी समुद्रात प्रवास करु शकते. त्याचबरोबर ही पाणबुडी कोणत्याही वातावरणात प्रवास करण्यासाठी सक्षम आहे.आतापर्यंत एमडीएलने तयार केलेल्या स्कॉर्पिन वर्गाच्या कलवरी, खंडेरी, करंज , वेला या पाणबुड्याचा समावेश भारतीय नौदलात झालं आहे.

वागशीर ही पाणबुडी समुद्रात गस्त घालून हेरिगिरी करण्याच काम करणार आहे. इटकच नाही तर मेक इन इंडिया अंतर्गत तयार झालेल्या या पाणबुडी मध्ये कराडमध्ये तयार केलेले  ए. सी लावण्यात आले आहेत. या पाणबुडीच्या एसी साठी  देश विदेशातून टेंडर मागवण्यात आले होते पण यात कराडच्या रेफ्रीजरेशनने बाजी मारली. कराड मधील श्री रेफ्रीजरेशनचे आर. जी. शेंडे यांनी ही यंत्रणा तयार केली. ते गेल्या दोन वर्षांपासून ते या यंत्रणेवर काम करत होते. त्यांची कंपनी अतिशय चांगल्या दर्जाचे उत्पादन तयार करते, त्यामुळे नौदलाच्या कडक चाचणीत ते यशस्वी होऊ शकले, अस राजश्री शेंडे यांनी म्हटल आहे. या औद्योगिक योगदानामुळे जागतिक पातळीवर कराडच नाव पुढे आल.

Share