माझं लातूर परिवाराच्या रक्त तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

लातूर : माझं  लातूर परिवार आणि लायन्स क्लब लातूर सेंट्रलच्या संयुक्त विद्यमाने दर्पण दिनामिमित्त आयोजित मोफत रक्तदाब, रक्त तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून तब्बल ८७ पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांनी या शिबिराचा लाभ घेतला.

शहरातील माऊली डायबेटिक सेंटर येथे आज सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत हे शिबिर घेण्यात आले. जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते लायन्स क्लब सेंट्रलचे मार्गदर्शक डॉ विजयकुमार राठी यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी लायन्स क्लबचे अध्यक्ष प्रसाद हंचाटे, माझं लातूर परिवाराचे योगेश सपकाळे, डॉ आनंद कलमे यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ श्यामसुंदर सोनी, डॉ शारदा कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली ८७ पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांची रक्तदाब आणि रक्तातील साखर तपासणी करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिपरत्न निलंगेकर यांनी केले तर आभार डॉ सितम सोनवणे यांनी मानले.

शिबिराच्या यशस्वीतेसाठी माझं लातूर परिवाराचे गोपाळ झंवर, अभय मिरजकर, काशिनाथ बळवंते, संजय स्वामी, किशोर जैन जुगलकिशोर तोष्णीवाल, तम्मा पावले, सुनिल गवळी, सचिन सोळुंके, विनोद कांबळे, वामन पाठक, ॲड. प्रदीप मोरे, प्रमोद गुडे, युवराज कांबळे, रत्नाकर निलंगेकर, श्रीराम जाधव, मित्रजित रणदिवे, गोविंद हेड्डा यांच्यासह लायन्स क्लबचे भरत हंचाटे, रविंद्र असोपा, राजेश खंडेलवाल यांनी परिश्रम घेतले.

Share