भाजयुमोच्या युवा मेळाव्याचे लातूरात बुधवारी आयोजन

लातूर : भारतीय जनता युवा मोर्चा लातूर शहर जिल्ह्याच्यावतीने येत्या ११ जानेवारी रोजी लातूरमध्ये युवा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. येथील कन्हेरी रोडवरील रामकृष्ण मंगल कार्यालयात सायंकाळी ५ वाजता होणाऱ्या युवा मेळाव्यास भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी आ. संभाजी पाटील निलंगेकर, खा. सुधाकर श्रृंगारे, भाजपा जिल्हाध्यक्ष आ. रमेश कराड, आ. अभिमन्यू पवार, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य शैलेश लाहोटी, अनिल पाटील बोरगावकर उपस्थित राहणार आहेत.

तसेच भाजपचे लातूर शहर जिल्हा सरचिटणीस दिग्विजय काथवटे, प्रविण सावंत, शिरीष कुलकर्णी, विवेकानंद उजळंबकर, अरूण पाठक, प्रेरणाताई होणराव, दत्ता चेवले, अमोल निडवदे, गणेश गोमचाळे, रविशंकर केंद्रे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या युवा मेळाव्यास युवा पदाधिकारी व युवा कार्यकत्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन भारतीय जनता युवा मोर्चा लातूर शहर जिल्हाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर यांनी केले आहे.

Share