औरंगाबाद : राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या गाडीला अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. मंगळवारी रात्री परळीच्या दिशेनं परतताना हा अपघात झाला. यामध्ये धनंजय मुंडे यांच्या छातीला किरकोळ मार लागल्याची माहितीही मिळाली आहे. यासंदर्भात धनंजय मुंडे यांनी स्वत: ट्विट करून ही माहिती दिली आहे.
मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास धनंजय मुंडे यांच्या वाहनाचा अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातामध्ये धनंजय मुंडे हे किरकोळ जखमी झाले आहेत. अपघातामध्ये मुंडे यांच्या छातीला मार लागला आहे. त्यांना डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला.
काल दिवसभर मतदारसंघातील कार्यक्रम व भेटी आटोपून परळीकडे परतताना रात्री12.30 वाजण्याच्या सुमारास@dhananjay_munde साहेबांच्या वाहनास परळी शहरात वाहनचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने छोटासा अपघात झाला आहे.साहेबांच्या छातीला किरकोळ मार लागला असून डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे
— OfficeofDM (@OfficeofDM) January 4, 2023
दरम्यान, मंगळवारी दिवसभर मतदारसंघातील कार्यक्रम व भेटी आटोपून परळीकडे परतताना रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास परळी शहरात माझ्या वाहनचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने छोटासा अपघात झाला आहे. माझ्या छातीला किरकोळ मार लागला असून डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे. काळजी करण्यासारखे काही नाही, कृपया अफवांवर विश्वास ठेवू नये. असे आवाहन धनंजय मुंडे यांनी केले आहे