पिंपरी चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचं निधन

पुणे : पिंपरी-चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचं निधन झालं आहे. त्यांनी वयाच्या ५९  व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. लक्ष्मण जगताप दुर्धर आजाराने त्रस्त होते.  गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची आज प्राणज्योत मालवली.

आमदार लक्ष्मण जगताप यांनी काही दिवसांपूर्वी दुर्धर अशा आजारावर त्यांनी मात केली अस बोललं जातं होत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा देखील होत होती. पण, दीपावलीनंतर त्यांना पुन्हा प्रकृतीच्या कारणास्तव रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचार सुरू असताना त्यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर संपुष्टात आली, अशी माहिती निकटवर्तीयांनी दिली. पुण्यातील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.

Share