दिल्ली- टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत ऐतिहासिक सुवर्णपदक पटकावणारा भालाफेकपटू नीरज चोप्रा आणि पॅरा-बॅडिमटनपटू प्रमोद भगतला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
#WATCH | Tokyo Olympic Gold medallist Neeraj Chopra receives Padma Shri award from President Ram Nath Kovind pic.twitter.com/S1NLkkc2J7
— ANI (@ANI) March 28, 2022
नवी दिल्ली येथील राष्ट्रपती भवनात झालेल्या सोहळय़ात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नीरज आणि प्रमोदला देशाचा चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला. नीरज आणि प्रमोद यांनी अनुक्रमे टोक्यो ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक स्पर्धामध्ये चमकदार कामगिरी केली होती. ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक सुवर्णपदक जिंकणारा नीरज हा नेमबाज अभिनव बिंद्रानंतरचा केवळ दुसरा भारतीय क्रीडापटू ठरला आहे, दुसरीकडे ३३ वर्षीय प्रमोद पॅरालिम्पिकमध्ये बॅडिमटन क्रीडाप्रकारात सुवर्णपदक जिंकणारा पहिलाच भारतीय खेळाडू आहे.