इतर मागासवर्गीय समाजावरील अन्यायाविरुद्ध पेटून उठा – नाना पटोले

मुंबई : इतर मागास वर्गिय समाजाच्या (ओबीसी) विविध मागण्या केंद्र सरकारकडे प्रलंबित आहेत पण केंद्रातील भाजप सरकार जाणीवपूर्वक त्याकडे दुर्लक्ष करुन ओबीसी समाजावर अन्याय करत आहेत. संविधानाने आपल्याला अधिकार दिलेले आहेत पण केद्रातील सरकार संविधान धाब्यावर बसवून काम करत आहे. ओबीसी समाजावर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध आता पेटून उठण्याची वेळ आली आहे. असे काॅँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

शेगवाव येथे ओबीसी समाज अधिकार संमेलन पार पडले यावेळी पटोले बोलत होते. या संमेलनाला छत्तिसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल, मंत्री यशोमती ठाकूर, आशिष दुआ, हर्षवर्धन सपकाळ, डॉ. बबनराव तायवाडे, आ. अमित झनक, राजेश एकडे, प्रदेश उपाध्यक्ष संजय राठोड, प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार, राहुल बोंद्रे, माजी आ. दिलीप सानंदा, प्रदेश सरचिटणीस शाम उमाळकर, स्वाती वाकेकर, रवी महाले, मंगेश भारसाखळे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना पटोले म्हणाले की, आजचे हे संमेलन केंद्र सरकारला इशारा देण्यासाठी आहे. ओबीसींंचे हक्क त्यांना मिळाले पाहिजेत आणि ते न्याय हक्क मिळवून देण्यासाठी काम करु. ओबीसी आरक्षणासाठी आवश्यक असलेला केंद्र सरकारकडील डाटा ९८ टक्के अचून आहे पण ते देत नाहीत. जाणीवपूर्वक अडवणूक केली जात आहे. महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे, महात्मा फुले व सावित्रिबाई यांनी देशाला दिशा देण्याचे काम केले पण त्यांचा अपमान करण्याचे धाडस राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले, महाराष्ट्र हा अपमान सहप करणार नाही. ओबीसी समाजासाठी मी सदैव संघर्ष करत आलो आहे आणि आपले हक्क मिळवण्यासाठी यापुढेही संघर्ष करत राहू. ओबीसी समाजाच्या समस्यांसंदर्भात  राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी भेटून त्या मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करु असे नाना पटोले म्हणाले.

Share