वारे रे पाकिटमार मोदी सरकार पटोलेंचा मोदी सरकारवर निशाणा

मुंबई :  देशातील पाच राज्यातील विधानसभा निवडणूकीच्या काळात १३८ दिवस पेट्रोल, डिझेलची दरवाढ रोखून धरली आणि निवडणूका संपताच दररोज दरवाढ केली जात आहे. यावरुन आता काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदी सरकारवर जोरदार टिका केली.

यासंदर्भात नाना पटोले यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,‘कच्च्या तेलाच्या किंमतीत २६ टक्क्यांनी घट, तरीही आज पेट्रोलच्या दरात ८० पैशांची, तर डिझेलच्या दरात ७० पैशांची वाढ. आठवड्याभरात इंधनात ४.८० रुपयांची दरवाढ. वारे रे पाकिटमार मोदी सरकार’, असे पटोले म्हणाले.

दरम्यान याच पार्श्वभूमीवर २७ मार्च रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ३१ मार्चपासून राज्यभर ‘महागाईमुक्त भारत’ आंदोलनाचा सप्ताह आयोजित करण्यात आल्याची माहिती पटोले यांनी दिली. तसेच ३१ मार्च रोजी सकाळी ११ वाजता सर्व काँग्रेस कार्यकर्ते आंदोलन करतील. त्यानंतर २ ते ४ एप्रिल दरम्यान सर्व जिल्हा मुख्यालयात महागाईमुक्त भारत धरणे आंदोलन व मोर्चा आयोजित केला आहे. तद्पश्चात ७ एप्रिलला राज्य मुख्यालयात मुंबईत महागाईमुक्त भारत धरणे आंदोलन व मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच गरज सरो, वैद्य मरो’ या म्हणीसारखा भाजपचा कारभार असल्याचेही ते म्हणाले.

 

Share