तेल कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी, घराबाहेर पडण्याआधी चेक करा लेटेस्ट दर

मुंबई : तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत. आज सकाळी ६ वाजता तेल कंपन्यांनी इंधनाच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. केंद्राकडून पेट्रोल आणि डिझेलवर लावण्यात येणाऱ्या अबकारी करात कपात केल्याने पेट्रोल ८ रुपये आणि डिझेलच्या दरात ६ रुपयांची कपात करण्यात आली आहे. त्यामुळे महागाईत भरडल्या जाणाऱ्या जनतेला दिलासा मिळत आहे.

पेट्रोलियम कंपन्यांकडून जारी करण्यात आलेल्या नव्या दरानुसार, आज मुंबईत पेट्रोलचा दर १०६.३५ रुपये तर डिझेलचा दर ९४.२२ रुपये प्रतिलिटर आहे. त्याच वेळी, पुण्यात पेट्रोलचा दर प्रति लिटर १०५ रुपये तर डिझेलचा दर ९२ रुपये प्रति लिटर आहे. तर नागपुरात पेट्रोलचा दर प्रति लिटर १०६.६५ रुपये तर डिझेलचा दर ९३.५८ रुपये प्रति लिटर आहे.

पेट्रोल डिझेलचे दर अशा प्रकरे तपासा

इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून ९२२४९९९२२४९ या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल.

Share