मुंबई-
राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना ईडने आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी काही दिवसांपूर्वी अटक केली होती. न्यायालयाने त्यांना ३ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. याच प्रकरणात आता नवाब मलिकांचा मुलगा फराझ यालाही ईडीकडून समन्स बजावण्यात आला आहे.
Dawood Ibrahim money laundering case | Enforcement Directorate summons Faraz Malik, son of NCP leader and Maharashtra minister Nawab Malik
— ANI (@ANI) March 1, 2022
दाऊद इब्राहीम याच्या क्रिकेटवरील सट्टेबाजी आणि बांधकाम व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक गैरव्यवहार करत असल्याच्या आरोपावरून ‘ईडी’ने दाऊद आणि त्याच्या नातेवाईकांविरोधात गुन्हा दाखल केला होता. याच प्रकरणात नवाब मलिक यांचा मुलगा फराझ मलिक याला ईडीने समन्स बजावला आहे.
याप्रकरणी ‘ईडी’ने दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरला ताब्यात घेऊन चौकशी केली़ दाऊदच्या संबंधित असलेल्या सुमारे ३०० कोटींच्या मालमत्तेचा व्यवहार करणाऱ्या कंपनीशी मलिक यांचा संबंध असल्याचे ‘ईडी’ला तपासात आढळले. त्यानुसार ‘ईडी’ने ही कारवाई केली होती.