जाणून घ्या, महाशिवरात्री पवित्र का मानली जाते?

 Mahashivratri: माघ कृष्ण चतुर्दशी ही तिथी महाशिवरात्र म्हणून पाळली जाते. या दिवशी उपवासाचे व्रत करतात. भगवान शिवाची आराधना आणि प्रार्थना करून दुसर्‍या दिवशी व्रताची सांगता केली जाते. महाशिवरात्री माघ वद्य त्रयोदशीला महाशिवरात्री म्हणतात. महाशिवरात्रीचे व्रत हे काम्य व नैमित्तिक कात आहे.

भारत एक असा राष्ट्र जो त्याच्या संपन्न आणि समृद्ध संस्कृती साठी अनमोल वारसा लाभल्या बद्दल परिचित आहे. हा वारसा भारत भूमीमध्ये अनंत काळापासून असलेल्या अध्यात्मिक ज्ञान आणि शक्तीचा आहे. ह्या सृष्टी मधील प्रत्येक गोष्टीच्या निर्मितीला जबाबदार असलेल्या त्या ईश्वरी दैवी शक्तीच्या सन्मानार्थ ‘महाशिवरात्री’ साजरी केली जाते. जी परंपरा आपल्याकडे वर्षानुवर्षे चालत आली आहे.

महाशिवरात्री का पवित्र मानली जाते?
आपल्या जीवनामध्ये विविध घटना चक्रे आहेत, जसे सूर्य उगवतो आणि मावळतो. आपल्याला ठराविक वेळीच झोप येते, जागे होतो, खातो, एक सवय बनून गेलीय. तसेच सूर्य प्रत्येक राशीमध्ये वर्षातून एकदा भ्रमण करतो म्हणून आपण आपला जन्मदिवस देखील वर्षातून एकदा साजरा करतो. तिन्ही ऋतू देखील सूर्याप्रमाणे भ्रमण करत असतात. तसेच महाशिवरात्री देखील वर्षातून एकदा येणारा महत्वाचा प्रसंग आहे.

‘हर हर महादेव’, जाणून घ्या महाशिवरात्रीची पूजा, शुभ मुहूर्त

प्राचीन ग्रंथांमध्ये असा उल्लेख आहे की, या दिवशी शिव तत्व (अव्यक्त दिव्यत्वाचे रूप) आपल्या भौतिक प्राप्तीसाठी आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी पृथ्वीवर अवतरीत होते. म्हणून उपवास, मंत्रोच्चार, प्रार्थना आणि ध्यान करून महाशिवरात्री साजरी केली जाते. जे महाशिवरात्रीला उपवास आणि साधना करतात त्यांना भगवान शिव आशीर्वाद देतात असे म्हणतात.

महाशिवरात्रीला उपवास करण्याचे महत्व
भारतमध्ये सर्वत्र महाशिवरात्रीला उपवास केला जातो. शरीर शुद्धीकरणासाठी उपवास केले जातात. ठराविक प्रमाणात घेतलेला ठराविक आहार शरीरावर विशिष्ठ परिणाम करतात. म्हणून शरीर शुद्धीकरणासाठी आणि मन सजग आणि शांत बनते. काहीजण दूध आणि फळे खाऊन उपवास करतात तर काहीजण निव्वळ पाणी पिऊन उपवास करतात. थोडीशी फळे आणि पाणी पिऊन उपवास करावा किंवा पचायला हलका आहार घेऊन उपवास केल्याने शरीर हलके रहाते. उपवासासोबत रात्रभर आराधना, प्रार्थना आणि ध्यान करत जागरण करावे. महाशिवरात्रीच्या रात्री किंवा दुसऱ्या दिवशी उपवास सोडावा.

Share