तेल कंपन्यांकडून पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी, चेक तुमच्या शहरातील इंधनाचा भाव

मुंबई : तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत. आज सकाळी ६ वाजता तेल कंपन्यांनी इंधनाच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. दोन दिवसांपुर्वी केंद्र सरकारनं पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केलं होतं. त्यानंतर राज्य सरकार कडून पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या वतीनं घेण्यात आला. राज्य सरकारनं पेट्रोल-डिझेलवरील व्हॅटमध्ये अनुक्रमे २ रुपये ८ पैसे आणि डिझेलवर १ रुपये ४४ पैसे कपात केली आहे.

प्रमुख शहरातील पेट्रोल आणि डिझेचे दर
पेट्रोलियम कंपन्यांकडून जारी करण्यात आलेल्या नव्या दरानुसार आज राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर ९६.७२ रुपये असून, डिझेलचा दर प्रति लिटर ८९.६२ रुपये आहे. मुंबईमध्ये पेट्रोलचा भाव प्रति लिटर १११.३५ रुपये असून, डिझेलचा दर प्रति लिटर ९७.२८ रुपये इतका आहे. चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर १०२.६३ रुपये आहे. तर डिझेलचा दर प्रति लिटर ९४.२४ रुपये इतका आहे कोलकातामध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर १०३.०३ रुपये आहे. तर डिझेलचा दर प्रति लिटर ९२.७६ रुपये इतका आहे.

पेट्रोल डिझेलचे दर अशा प्रकरे तपासा

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर सोप्या पद्धतीने पाहता येतील.

आजचे पेट्रोल-डिझेलचे दर तुम्ही मोबाईलच्या माध्यमातून देखील जाणून घेऊ शकताय. SMS च्या माध्यमातून देखील तुम्हाला नेहमीचे दर कळू शकतात. इंडियन ऑईलचे ग्राहक RSP लिहून ९२२४९९२२४९ या नंबरच्या माध्यमातून पेट्रोल डिझेलचे दर जाणून घेऊ शकतात. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे.

Share