नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी सर्वसामान्यांना महागाईचा झटका

नवी दिल्ली : नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी सर्वसामान्यांना महागाईचा झटका बसला आहे. आजपासून व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत २५ रुपयांची दरवाढ करण्यात आली आहे. तर दुसरीकडे घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत.

नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून म्हणजेच आजपासून १ जानेवारी २०२३ पासून व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ झाली आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे घरातील किचन बजेट बिघडणार नाही. मात्र, व्यावसायिक गॅस सिलेंडर महाग झाल्याने रेस्टॉरंट, हॉटेल आदींतील खाद्यपदार्थ महाग होऊ शकतात. एलपीजीचे नवे दर आजपासून लागू झाले आहेत.

व्यावसायिक सिलिंडरचे दर
दिल्ली – १७६९
मुंबई – १७२१
कोलकाता – १८७०
चेन्नई – १९१७

घरगुती सिलिंडरचे दर
दिल्ली – १०५३
मुंबई – १०५२
कोलकाता – १०७९
चेन्नई – १०६८

Share