शहरातील दहावी बारावीचे वर्ग सोमवारपासून सुरु होणार

औरंगाबाद- शहरातील १० वी व १२वी चे वर्ग सोमवारपासून सुरु होणार असून प्रशासनाकडून परवानगी देण्यात आली आहे.  यासंबंधाचे आदेश महानगरपालिका प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी शुक्रवारी सायंकाळी काढले आहेत.

शासनाने सोमवारपासून पहिली ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरु करण्याचे आदेश काढले आहेत. मात्र शहरातील शाळांबाबतचा निर्णय आठ दिवसांनी घेण्यात येणार आहे. शहरातील वाढता संसर्ग लक्षात घेता पुढील आठ दिवसांनी परिस्थिती पाहून शाळांचा निर्णय घेण्यात येईल असे प्रशासक पाण्डेय यांनी स्पष्ट केलं. मात्र दहावी आणि बारावी बोर्डाच्या परिक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले असून विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून या दोन्ही वर्गांच्या शाळा सुरु केल्या जाणार आहेत .

या दोन्ही वर्गात शिकणाऱ्या आणि लसीसाठी पात्र विद्यार्थ्यांनी लसीचा एक डोस घेतला असेल तरच त्यांना वर्गात बसण्याची परवानगी द्यावी, शिक्षकांचे लसीकरण पूर्ण जालेले असावे, असेही प्रशासकांनी बजावले आहे.

 

Share