मुंबईचा दादा फक्त शिवसेना- संजय राऊत

दिल्ली :  शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. दरम्यान  राऊत यांच्या गंभीर आरोपांमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापण्याची शक्यता आहे. राऊत यांनी या पत्रानंतर दिल्लीत पत्रकार परिषद घेत अनेक खळबळजनक आरोप केले. यावेळी त्यांनी मुंबईचा दादा फक्त शिवसेना आहे अशा शब्दात भाजपावर निशाणा साधला.

ईडीचे सर्वाधिक खटले महाराष्ट्रातच कसे? यूपी, बिहार आणि दिल्लीत कसे नाहीत?, असा सवाल करतानाच महाराष्ट्रातील ठाकरे सरकार पाडण्यासाठीचा हा डाव आहे. त्यासाठीच हे षडयंत्र सुरू आहे, असा दावाही राऊत यांनी केला आहे. राऊत यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन हा इशारा देतानाच लेटरबॉम्बही टाकला आहे.

Share