विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस कोरोनामुक्त

मुंबई : विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली आहे. यासंदर्भात त्यांनी स्वत: ट्वीट करत माहिती दिली होती. पण आता देवेंद्र फडणवीस कोरोनामुक्त झाले असून त्यांची कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ते बैठकांना प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी ट्विट करून त्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली. तेव्हापासून देवेंद्र फडणवीस होम क्वारंटाईन असून त्यांच्यावर औषधोपचार सुरु होते. राज्यसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना देवेंद्र फडणवीस यांना घरात बसून राहावे लागल्याने भाजपची गोची झाली होती. मात्र, फडणवीस यांनी घरात बसूनही फोनवरून अपक्ष आमदारांशी बोलणी करुन त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, आता देवेंद्र फडणवीस कोरोनामुक्त झाल्याने प्रत्यक्ष मैदानात उतरुन राज्यसभा निवडणुकीची सारी सूत्रे हलवू शकणार आहेत. ही भाजपसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे.

Share