ओवेसी यांच्या दीर्घयुष्यासाठी १०१ बकऱ्यांची कुर्बानी

दिल्लीः एमआयएम’ पक्षाचे प्रमुख आणि लोकसभा खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या दीर्घयुष्यासाठी एका व्यापाऱ्याने चक्क १०१ बकऱ्यांची कुर्बानी दिल्याची धक्का दायक माहिती समोर आली आहे. हैदराबादमध्ये एका व्यापाऱ्याने बाग-ए-जहानारा मध्ये दीर्घायुष्यासाठी प्रार्थनाही करण्यात १०१ बकऱ्यांची कुर्बानी दिली. बकऱ्यांच्या बळी देण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

उत्तर प्रदेशातील हापूर येथून दिल्लीला जात असताना ओवेसी यांच्या वाहनावर हल्ला झाला. दोन पिस्तुलधाऱ्या हल्लेखोरांनी फायरिंग केली. त्यात ओवेसी थोडक्यात बचावले, पण त्यांच्या गाडीची गोळ्यांनी चाळणी झाल्याचे समोर आले. खुद्द ओवेसींनीही त्यांच्या गाडीची काय स्थिती झाली त्याचे फोटो ट्विट केले होते. पोलिसांनी त्यानंतर दोन हल्लेखोरांना ताब्यात घेतले. केंद्र सरकारने त्यांना झेड प्लस सुरक्षा देऊ केली. मात्र, त्यांनी ती नाकारत उत्तर प्रदेश, केंद्र तसेच निवडणूक आयोगाने ह्या हल्ल्याची स्वतंत्र चौकशी करावी, अशी मागणी केलीय.

ऐन निवडणुकीच्या आधी ओवेसीवर झालेल्या गोळीबाराने राजकारण तापले आहे. दुसरीकडे ओवेसींच्या दीर्घायुष्यासाठी त्यांच्या समर्थकांनी प्रार्थना केल्या आहेत. हैदराबादमध्ये एका व्यापाऱ्याने चक्क एकशे एक बऱ्यांची कुर्बानी दिली. यावेळी आमदार आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे नेते अहमद बलाला यांचीही उपस्थिती होती. दरम्यान, ३ फेब्रुवारी रोजीही ओवेसी यांच्या दीर्घायुष्यासाठी त्यांच्या समर्थकांनी प्रार्थना केली होती.

खासदार ओवेसी यांनी ‘झेड प्लस’ सुरक्षा नाकारली

 

 

 

Share