धक्कादायक ! पोटच्या पोरानेच केली वडीलांची हत्या…

औरंगाबाद- गंगापुर तालुक्यातील दहेगाव बंगला येथे मुलानेच बापाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.आईच्या आत्महत्येचा राग मनात बाळगून तरुणाने जन्मदात्या पित्याची हत्या केल्याची घटना दहेगाव बंगला येथे घडलीय.

दहा वर्षापूर्वी कडुबाळ सोनवणे यांच्या पत्नीने घरगुती वादातून स्वतःला जाळून घेऊन आत्महत्या केली होती. तेव्हापासून कडुबाळ सोनवणे आपल्या दोन मुलांसह राहत होते. अनिल (२२) आणि सुनील (२८) या दोन मुलांसोबत राहत होते. मात्र मुलगा अनिल आईच्या आत्महत्येचा राग मनात ठेवून वडिलांसोबत नेहमीच वाद घालायचा. शनिवारी जेवण्यास नीट दिले नाही या कारणावरून वडिलांसोबत अनिलचा वाद झाला. वडील घराबाहेर झोपले असता अनिल रागारागात त्यांच्याजवळ गेला आणि त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करु लागला. तो बराच वेळ आपल्या वडीलांना लाथाबुक्क्यांनी मारत होता. संतापलेल्या अनिलने आपल्या जन्मदात्या वडीलांची लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

सदर घटनेची माहिती  रविवारी पहाटे स्थानिक पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत अनिल याला ताब्यात घेतल आहे  .  पोलीस उपायुक्त उज्वला बनकर यांच्या नेतृत्वाखाली वाळूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन इंगोले, सहाय्यक पोलीस निरीक्षक विनायक शेळके, पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण उंभरे आणि अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे.

Share