मुंबई- राज्यात वीज बील वसलू प्रकरणावरून आघाडी आणि विरोधी पक्षात चांगलीच जुंपली आहे. शेतकऱ्यांकडे थकित असलेले वीज बील आता साखर कारखाने उसाच्या बीलातून वसुल करत असल्याने राज्य सरकारवर आता विरोधीपक्षांकडून ताशेरे ओढले जात आहे. यावर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया नोंदवली आहे.
महाराष्ट्राचे वीज मंडळ सावकारी
राज्य सरकारकडून पठाणी वसुली!
अशी वाटमारी करणे हा शेतकर्यांना नागविण्याचा प्रयत्न!
माध्यमांशी संवाद…https://t.co/Glq2ljlTFc pic.twitter.com/6uXxkKmpUo— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 29, 2022
महाराष्ट्राचं वीज मंडळ हे सावकारी झालं आहे. हे सरकार पठाणासारखं वसुली करणारं सरकार झालं आहे. हि वसुली करुन शेतकऱ्यांना नागवण्याचा प्रयत्न केला जात आहे. शेतकऱ्याच्या मेहनतीच्या पैशांच नियोजन केलेल असतं आणि घरातल्या कामकाजाला, कार्यक्रमाला,सणासुदीला किंवा मुलांच्या शिक्षणाचं ह्या नियोजन केलेल्या पैशाची वाटमारी करणं हे चूकीच आहे. हि पध्दत बंद झाली पाहिजे. असं मत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे.