पटोलेंवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करा- नितीन गडकरी

दिल्ली- काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या वक्तव्याने नवीन वादाला सुरुवात झाली आहे.  या वक्तव्यामुळे भाजपकडून जोरदार टिका केली जात आहे. यात केंद्रीय मंत्री नितून गडकरी यांनी  पटोलेंविरूध्द गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वापरलेली भाषा अतिशय आक्षेपार्ह व निंदनीय आहे. माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे, की पटोलेंवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी,” अशी मागणी नितीन गडकरी यांनी केली आहे.

यावर नाना पटोले यांनी स्पष्टीकरण दिल आहे. जे काही वक्तव्य माझ्या नावाने दाखवले जात आहे त्यामध्ये लोक माझ्या सभोवताली गोळा झालेले आहेत. सध्या आमच्या जिल्ह्यामध्ये निवडणुका सुरु आहेत. निवडणुकांच्या प्रचारामध्ये एका मोदी नावाच्या गावगुंडाची तक्रार लोक मला करत होते. त्या गावगुंडाला मी बोलूही शकतो आणि मिळाला तर मारुही शकतो. तुम्हाला घाबरण्याचे कारण नाही. मी त्या गावगुंड मोदीबद्दल बोललो आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल नाही,” अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली आहे.

Share