महाराष्ट्रातील नेत्यांची अयोध्या ‘वारी’ ठाकरेंनंतर पटोलेही अयोध्येला जाणार

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राज्याचे मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पाठोपाठ आता काॅंग्रसेचे प्रदेशध्याक्ष नाना पटोले हे देखील आता अयोध्यावारी करणार आहेत. आज अयोध्येतील दशरथ गादीचे प्रमुख महंत ब्रिजमोहनदास यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन, दादर येथे भेट देऊन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना प्रभू श्रीरामचंद्राचे दर्शन घेण्यासाठी अयोध्येला भेट देण्याचे निमंत्रण दिले.ट

राज ठाकरे जून महिन्यात अयोध्या दौऱ्यावर
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा जाहीर केला आहे. ५ जून रोजी राज ठाकरे आपल्या पक्षाच्या नेत्यांसह अयोध्येला जाणार आहेत. पुण्यात १७ एप्रिल रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली होती. काही दिवसांपूर्वी शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे अयोध्येला जाणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर आता राज ठाकरे यांनी आपल्या अयोध्या दौऱ्याची घोषणा केली आहे.

मंत्री आदित्य ठाकरेंचा दौरा
राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यानंतर आदित्य ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. आदित्या ठाकरे १० जुन रोजी अयोध्येला जाणार असल्याची माहिती शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली आहे.

Share