पवारांनी पंतप्रधानांकडे केली राज्यपालांची जाहीर तक्रार

पुणे : काही दिवसांपूर्वी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी  छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी एक वादग्रस्त व्यक्तव्य केलं होतं. त्याच वक्तव्यावरुन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यपालांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे जाहीर तक्रार केली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या भाषणा दरम्यान राज्यापाल भगतसिंह कोश्यारी यांची जाहीर तक्रार केल्यांच दिसून आलं. ‘मला पंतप्रधानांच्या लक्षात आणून द्यायचं आहे की, महत्त्वाच्या पदांवर असणाऱ्या काही व्यक्तींकडून अनावश्यक वक्तव्य केली जात आहेत, ते महाराष्ट्राला परवडणारे नाही. त्यामुळं याकडेही लक्ष द्यावं,’ असं म्हणत अजित पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं नाव न घेता त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांवर टीका केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांनी राजमाता जिजाऊ मां साहेबांच्या संकल्पनेतून स्वराज्य उभारले. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी सत्यशोधक विचारांच्या सहाय्यानं समाजकार्य केलं. या कोणाबद्दल देखील असुया किंवा द्वेष न ठेवता आपल्याला विकासाचे काम पुढे न्यायचं आहे, असं म्हणत अजित पवारांनी राज्यपालांचं नाव न घेता पंतप्रधान मोदींकडे तक्रार केली आहे.

काय म्हणाले होते राज्यापाल?

‘आमचे छत्रपती शिवाजी महाराज यांनी संकल्प केला होता आणि त्यांच्यामध्ये संकल्प पूर्ण कऱण्यासाठी समर्थ रामदास यांच्यासारखे गुरू मिळाले होते. राजा, महाराज, या सर्वांना गुरू होते. चाणक्याशिवाय चंद्रगुप्तला कोण विचारणार होतं. समर्थ यांच्या शिवाय शिवाजी महाराज यांना कोण विचारणार होतं’ असं राज्यपाल म्हणाले. तसंच, ‘शिवाजी महाराज हे काही चंद्रगुप्त इतके लहान नाही परंतु, त्यांच्या पाठीमागे जसा आईचा हात होता, तसेच गुरू उभे होते. समाजामध्ये गुरूचे मोठे स्थान आहे’ असंही राज्यपाल म्हणाले होते.

Share