इंधन दर वाढण्याची शक्यता, जाणून घ्या आजचा पेट्रोल आणि डिझेलचा भाव

मुंबईः  रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्याने पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन दरवाढीचा सपाटा लावला आहे. मागील जवळपास चार महिन्यांपासून इंधन दर स्थिर आहेत. तर आता मागील काही दिवसात कच्च्या तेलाच्या दराचे उच्चांक गाठला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात मोठ्या घडामोडी घडत असताना दुसरीकडे भारतातील इंधन कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे दर कायम ठेवले आहेत. सोमवारनंतर देशात इंधन दरवाढीचा भडका उडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

देशभरात सुरू असलेल्या निवडणुकांमुळे पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधन दरवाढीचा निर्णय लांबणीवर गेला असल्याची चर्चा सुरू आहे. आता मात्र, सोमवारी शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. त्यामुळे सोमवारी संध्याकाळीच दरवाढ होऊ शकते, अशीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 राज्यातील प्रमुख शहरातील इंधन दर

प्रमुख शहरे     पेट्रोलची किंमत प्रति लिटर            डिझेलची किंमत प्रति लिटर
मुंबई     –          १०९.९८ रुपये प्रति लिटर             ९४.१४ रुपये प्रति लिटर
ठाणे      –         ११०.१२ रुपये प्रति लिटर               ९४.२८ रुपये प्रति लिटर
पुणे       –           १०९.५२ रुपये प्रति लिटर               ९२.३१ रुपये प्रति लिटर
नाशिक   –         ११०.४० रुपये प्रति लिटर                ९३.१६ रुपये प्रति लिटर
नागपूर     –        ९५.२७ रुपये प्रति लिटर                 ८६.५१ रुपये प्रति लिटर
कोल्हापूर   –       ११० .०९ रुपये प्रति लिटर              ९२.८९ रुपये प्रति लिटर
अहमदनगर  –     १०९.५५ रुपये प्रति लिटर               ९२.३५ रुपये प्रति लिटर
अमरावती     –    १११.५५ रुपये प्रति लिटर                ९५.७४ रुपये प्रति लिटर

 

Share