सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलं, पेट्रोल डिझेल दरवाढ सुरूच

नवी दिल्ली : देशातील पाच राज्याच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन दरवाढीचा सपाटा सुरु केला आहे. आज देशभरात पेट्रोल ३१ पैसे आणि डिझेल दरात ३७ पैशांची वाढ झाली. तेल कंपन्यांनी गेल्या ७ दिवसात ६ वेळा पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ केलीय.

पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. आज सकाळी ६ वाजल्यापासून पेट्रोल ३१ पैशांनी तर डिझेल ३७ पैशांनी महागले आहे. २२ मार्चपासून पेट्रोल-डिझेलचे दर वाढण्यास सुरुवात झाली. त्यानंतर एक दिवस वगळता दररोज दरांत वाढ होतेय. आजच्या दरवाढीमुळे ७ दिवसांत पेट्रोल ४ रुपयांनी तर डिझेल ४.१०रुपयांनी महागले आहे.

पेट्रोल डिझेलचे दर अशा प्रकरे तपासा

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर सोप्या पद्धतीने पाहता येतील. आजचे पेट्रोल-डिझेलचे दर तुम्ही मोबाईलच्या माध्यमातून देखील जाणून घेऊ शकताय. SMS च्या माध्यमातून देखील तुम्हाला नेहमीचे दर कळू शकतात. इंडियन ऑईलचे ग्राहक RSP लिहून ९२२४९९२२४९ या नंबरच्या माध्यमातून पेट्रोल डिझेलचे दर जाणून घेऊ शकतात. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे.

Share