‘अहो अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा, जरूर पहा हा खड्डा’; रिकाम्या खुर्च्यांचा व्हिडीओ ट्विट करत ठाकरे गटाचा टोला

औरंगाबाद : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्ड यांच्या उपस्थितीत लोकसभा मिशन ४५ आणि विधानसभा मिशन १४५ साठी जोरदार तयारी करण्यात येत आहे.  त्याचाच एक भाग म्हणून काल औरंगाबादमध्ये जे.पी. नड्डा यांची सभा आयोजित करण्यात आली आहे. मात्र, जे.पी. नड्डा यांच्या भाषणापूर्वीचं महिला सभेतून उठून गेल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. यावरून विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ट्विट भाजपला जोरदार टोला लगावला आहे.

अंबादास दानवे आपल्या ट्विट म्हणतात की, ‘अहो अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा, जरूर पहा हा खड्डा.’ त्यांनी पुढे लिहिलं आहे की, ”लोक आपले भाषण सुरू होण्यापूर्वीच खुर्च्या सोडून गेले. संभाजीनगर फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा आहे. हे आज तुमच्याच साक्षीने जनतेने अधोरेखित करून टाकले आहे. असंही दानवेंनी म्हटलं आहे.

दरम्यान,  जे.पी. नड्डा यांनी कालच्या भाषणात बोलताना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख बाळासाहेब देवरस केला होता. यावरूनही अंबादास दानवे यांनी टिका केली आहे. “नड्डाजी, यापुढे महाराष्ट्रात येताना ‘बाळासाहेब ठाकरे’ हे नाव पाठ करून या. आज सभेत आपण त्यांचा ‘बाळासाहेब देवरस’ असा उल्लेख केला. जे बाळासाहेबांच्या नावाचा उल्लेख धड करू शकत नाहीत, ते त्यांच्या धगधगत्या विचारांचा वारसा काय सांभाळणार! असं अंबादास दानवेंनी सांगितलं.

Share