चीनमध्ये १३३ प्रवाशांना घेऊन जाणारे विमान कोसळले

आंतरराष्ट्रीय-  चीनमधील एका विमानाचा अपघात झाल्याची माहिती एएनआयने प्रसिध्द केली आहे. १३३ प्रवाशांना घेऊन जाणारे एक चायना इस्टर्न पॅसेंजर जेट चीनच्या नैऋत्य भागामध्ये क्रॅश झाले आहे. दरम्यान, मृतांची आकडेवारी अद्याप स्पष्ट नसल्याचे सांगितले जात आहे.

बोईंग ७३७ विमान वुझोउ शहर, गुआंग्शी प्रदेशाजवळील ग्रामीण भागात क्रॅश झाले आणि त्याला आग लागली होती. घटनास्थळी बचाव पथके पाठवण्यात आली आहेत, असंही सीसीटीव्हीने सांगितलं आहे . कुनमिंगहून ग्वांगझूला १३३ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या चायना इस्टर्न एअरलाइन्सच्या विमानाचा गुआंग्शी प्रदेशात अपघात झाला आणि आग लागली. अपघात झालेले जेट हे बोईंग ७३७ विमान होते आणि मृतांची संख्या अद्याप कळू शकलेली नाही, अशी माहिती रॉयटर्सने दिली आहे.

Share