मुंबई- नाना पटोले यांनी काल केलेल्या वक्तव्यावरून महाराष्ट्राचं राजकारण चांगलच पेटलं आहे. भाजपने पटोले यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तर दुसरीकडे राज्यतील काँग्रेसकडून याप्रकरणाची सावरासावर सुरु आहे. पटोले यांनी यासंबंधी स्पष्टीकरण देत म्हंटल आहे की, मी गावगुंड मोदी बद्दल बोलत होतो. त्याला भंडारा पोलिसांनी अटक केली असून चौकशी सुरु आहे असं त्यांनी स्पष्टीकरणात म्हंटल आहे.
गावगुंड आहे ना @NANA_PATOLE चला मग 'त्या' गुंडाची छायाचित्रासह माहिती प्रसिद्ध करा…किती खटले दाखल आहेत तेही सांगा…
बर गावगुंडवर तुमच सरकार असून कायदेशीर कारवाई नाही होऊ शकत? @OfficeofUT सरकारवर एवढा अविश्वास? तुम्हाला मारहाणीची भाषा का वापरावी लागते ?— Keshav Upadhye (@keshavupadhye) January 18, 2022
आता भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विट करत नाना पटोले यांना चॅलेंज करत त्या गावगुंडाचा फोटो पुराव्यासह टाकावा.तसेच त्याची माहिती प्रसिध्द करावी आणि त्यावर किती खटले दाखल आहेत तेही सांगावे. विशेष म्हणजे राज्यात सरकार तुमच आहे तर कायदेशीर कारवाई होवू शकत नाही का? ठाकरे सरकारवर तुमचा विश्वास नाही का ? या संबंधात तुम्हाला केवळ मारहाणीचीच भाषा वापरवी लागते का ? असे सवाल केशव उपाध्ये यांनी उपस्थित केले आहेत.