सूरज को डुबाने का इरादा रखते है कुछ नन्हे पटोले- अमृता फडणवीस

नागपूरः  काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याने वादंग निर्माण झाले आहे. याविरोधात भाजप चांगलीच आक्रमक झाली आहे. ठिकठिकाणी नाना पटोले यांच्याविरोधात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही नाना पटोलेंवर सडकून टीका केली आहे. नाना पटोलेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी फडणवीसांनी केलीय. तसेच विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीसांनी ट्विटवरून शेरोशायरी करत पटोलेंवर निशाना साधला आहे.

अमृता फडणवीस यांनी ट्विट करत म्हटले आहे की, सूरज को डुबाने का इरादा रखते है कुछ नन्हे पटोले ! पर इल्म नहीं है उन्हें के इस प्रगति की रोशनी को बुझाने की होड़ में, खुद ही जल जाएँगे ये लाइलाज फफोले ! असे अमृता फडणवीसांनी म्हटले आहे यायाच अर्थ, मोदींसारख्या सुर्याला बुडवायचे इरादे ठेवताता नाना पटोलेंसारखे छोटे नेते, पण त्यांना हा अंदाज नाही की, प्रगतीच्या उजेडाला बुडवण्याच्या नादात ते स्वताच जळून खाक होतील, असे ट्विट अमृता फडणवीसांनी केले आहे, त्यामुळे यावरही अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटू शकतात.याआधीही अमृता फडणवीस ठाकरे सरकारवर वेळोवेळी ट्विटरवरून जोरदार निशाना साधताना दिसून आल्या आहेत, आता पुन्हा अमृता फडणवीस या ट्विटमुळे चर्चेत आल्या आहेत.

Share