पंतप्रधान मोदींनी माफी मागायला हवी; काँग्रेसची मागणी

नवी दिल्ली :  लोकसभेत काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र काँग्रेस आणि आप पक्षावर जोरदार टिका केली आहे. कोरोना महामारीच्या सुरवातीच्या काळातच देशभरात कोरोना पसरवण्याचं काम महाराष्ट्रातील काँग्रेस आणि आपने केला अशी नरेंद्र मोदी यांनी हल्लाबोल केला आहे. यावर आता काँग्रेस नेते आणि आपकडून मोदींना प्रत्युत्तर देण्यात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केजरीवाल सरकारवर टीका करताना म्हटले की, कोरोनाच्या पहिल्या लॉकडाऊनमध्ये दिल्लीमध्ये असं सरकार होते, जे झोपडीत राहणाऱ्यांना घरी जा, संकट वाढत आहे, असे सांगत होते. तसेच दिल्लीमधून जाण्यासाठी त्या सरकारने बसची व्यवस्थाही केली होती, पण त्यांना अर्ध्यावरच सोडलं होतं. त्यामुळेच उत्तरप्रदेश, पंजाब आणि उत्तराखंडमध्ये कोरोनाचा संसर्ग झाला. त्याआधी या राज्यात कोरोनाचा वेग कमी होता, असा टोला मोदी यांनी केजरीवाल यांना लगावला होता.

मोदींच्या या टीकेला उत्तर देताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोदींच्या भाषणाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यासोबत ते म्हणाले की, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलत आहेत. कोरोना काळात ज्या लोकांना त्रास सहन करावा लागला, अनेकांचा मृत्यू झाला. या लोकांमध्ये संवेदना व्यक्त करण्याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी राजकारण करत आहेत. पंतप्रधानांना हे शोभा देत नाही.

काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनीही मोदींवर निशाणा साधला. लॉकडाउनमध्ये मजुरांचे हाल झाल्यामुळे मोदींनी माफी मागायला हवी. पण मोदींनी माफी तर मागितली नाहीच, पण मदत करणाऱ्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

 

Share