पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ८ वर्षांत ११८ परदेश दौरे; ६३ पेक्षा अधिक देशांना भेटी

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान पदाची ८ वर्षे पूर्ण झाली आहेत. या ८ वर्षांत त्यांनी परदेश दौऱ्यांचे शतक पूर्ण केले आहे. २०१४ मध्ये पंतप्रधान झाल्यापासून गेल्या ८ वर्षांत नरेंद्र मोदी यांनी आतापर्यंत ११८ परदेश दौरे केले आहेत. नरेंद्र मोदींनी पंतप्रधान म्हणून ६३ हून अधिक देशांना भेटी दिल्या आहेत.

मे २०२२ पर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११८ परदेश दौरे केले आहेत, ज्यात त्यांनी तब्बल ६३ देशांना भेटी दिल्या आहेत. नरेंद्र मोदींनी आतापर्यंत सर्वाधिक ३० परदेश दौरे २०१५ साली केले आहेत, तर सर्वात कमी ७ दौरे त्यांनी २०२१ या वर्षात केले. २०२२ मध्ये मोदींनी पाच देशांना भेटी दिल्या आहेत. चालू वर्षात म्हणजे २०२२ मध्ये मोदी हे ब्रिक्स, जी-७, जी-२० आणि २० व्या सार्क परिषदेसाठी परदेश दौरे करणात आहेत. याशिवाय इतर काही देशांना ते या वर्षात भेटी देतील.

भाजपने नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला. नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान पदाची ८ वर्षे नुकतीच पूर्ण झाली आहेत. गेल्या ८ वर्षातील नरेंद्र मोदी यांचे परदेश दौरे देखील गाजले. मोदींनी २०१४ पासून आतापर्यंत ११८ परदेश दौरे केले आहेत. मोदींनी पंतप्रधान म्हणून ६३ हून अधिक देशांना भेटी दिल्या आहेत. नरेंद्र मोदी यांच्या परदेशातील दौऱ्यात अनिवासी भारतीयांशी संवादाचे कार्यक्रमदेखील बरेच चर्चेत राहिले आहेत. गेल्या ८ वर्षांत मोदींनी अमेरिकेला सर्वाधिक भेटी दिल्या आहेत. मोदी यांनी आपल्या परदेश दौऱ्यात भारताचे इतर देशांशी संबंध सुधारणे, आंतरराष्ट्रीय संबंध मजबूत करणे, भारतातील उद्योग वाढीला चालना देणे त्याचबरोबर इतर महत्त्वपूर्ण बाबींवर मोठे काम केले आहे. मोदी यांच्या पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीत भारताची जगभरात पत उंचावली आहे.

८ वर्षे आणि ११८ परदेश दौरे
नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान पदाच्या दुसऱ्या टर्ममधील तिसरे वर्ष नुकतेच पूर्ण झाले आहे. त्यांची पंतप्रधान पदाची दुसरी टर्म संपण्यास अजून दोन वर्षे शिल्लक आहेत. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या १० वर्षांच्या कार्यकाळासोबत तुलना केली असता नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यांची संख्या अधिक असल्याचे दिसून येते. मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान असताना ७३ वेळा परदेश दौरे १० वर्षांच्या काळात केले होते. नरेंद्र मोदी यांनी ८ वर्षांच्या काळात अमेरिकेला ७ वेळा भेट दिली आहे, तर फ्रान्स, जर्मनी, चीन आणि रशियाला मोदींनी पाचवेळा भेट दिली आहे.

२०१५ मध्ये सर्वाधिक परदेश दौरे
नरेंद्र मोदी यांनी २०१५ मध्ये सर्वाधिक परदेश दौरे केले होते. मोदींनी त्यावर्षी २८ परदेश दौरे केले होते. २०१८ मध्ये मोदींनी २० परदेश दौरे केले होते. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या वर्षामध्ये मोदींच्या परदेश दौऱ्यांची संख्या घटली होती. २०१९ मध्ये मोदींनी १४ परदेश दौरे केले होते. २०२० मध्ये कोरोना संसर्ग सुरू झाल्याने नरेंद्र मोदींनी एकही परदेश दौरा केला नव्हता.

नरेंद्र मोदींनी २०१४ च्या मे महिन्यात पंतप्रधानपद स्वीकारल्यानंतर ९ परदेश दौरे केले होते, तर २०१५ मध्ये सर्वाधिक २८ परदेश दौरे केले होते. २०१६ मध्ये मोदींनी १८ तर २०१७ मध्ये १४ परदेश दौरे केले होते, तर २०१८ मध्ये पुन्हा मोदींच्या परदेश दौऱ्यांची संख्या वाढली. २०१९ मध्ये मोदींनी १४ परदेश दौरे केले होते. २०२० मध्ये कोरोना संसर्गामुळे मोदी परराष्ट्र दौऱ्यावर गेले नाहीत. २०२१ मध्ये त्यांनी ४ परदेश दौरे केले होते. यंदा म्हणजे २०२२ मध्ये आतापर्यंत मोदींनी ४ परराष्ट्र दौरे केले आहेत.अलिकडेच ते युरोप आणि जपान दौऱ्यावर गेले होते.

Share