प्रियंकाने दिली चाहत्यांना गुड न्युज !

मुंबई- बाॅलीवूडची देसी गर्ल म्हणून ओळखल्या जाणारी अभिनेत्री प्रियंका चोप्राने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. सोशल मीडियाच्या माध्यामातून तिने हि बातमी शेअर केली आहे. प्रियंका आणि निक जोनस यांनी सरोगसी पध्दतीने एका मुलाला जन्म दिला आहे. २०१८ साली प्रियंका आणि निकचा विवाह झाला होता.

नविन पाहुणा आल्यामुळे प्रियंका आणि निकवर शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे.प्रियंकाला काही दिवसांपुर्वी फॅमिली प्लॅनिंगबद्दल विचारण्यात आलं होत त्यावेळी ती म्हणाली निक आणि माझ्या संसारात बाळाला विशेष अस एक स्थान असणार आहे. आम्ही दोघांनी भविष्याचा विचार करून फॅमिली प्लॅनिंग केली आहे. असं उत्तर तिने दिलं होतं.

प्रियंकाने सोशल मीडीयाद्वारे आपल्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. निकला टॅग करत इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत म्हंटल आहे की, आम्ही सरोगसीव्दारे एका बाळाचे स्वागत केले आहे, हे सांगताना आम्हाला खूप आनंद होत आहे. हे क्षण आमच्यासाठी अतिशय खास आहेत आणि आम्हाला प्राव्हसीची गरज आहे. गरज आहे. कुटुंबासाठी वेळ द्यायचा आहे आहे. आमच्या भावनांचा आदर कराल अशी अपेक्षा आहे. खूप खूप धन्यवाद.” निकनेही हीच पोस्ट त्याच्या सोशल मीडिया पेजवर शेअर केली आहे.

Share