‘कौन बनेगा करोडपती १४’ चा प्रोमो व्हायरल; अमिताभ बच्चन पुन्हा झळकणार छोट्या पडद्यावर

मुंबई : छोट्या पडद्यावरील ‘कौन बनेगा करोडपती’ (केबीसी) हा रिअ‍ॅलिटी शो प्रेक्षकांसाठी खासच असतो. ‘कौन बनेगा करोडपती’ च्या प्रत्येक नव्या सिझनची प्रेक्षकांनाही आतुरता असते. आता प्रेक्षकांची प्रतीक्षा संपली आहे. कारण, ‘कौन बनेगा करोडपती’ (केबीसी) चा १४ वा सिझन लवकरच सुरू होत आहे. ‘केबीसी १४’ चा प्रोमो प्रेक्षकांपुढे आल्याने प्रेक्षकांची आनंद द्विगुणीत झाला आहे. ‘केबीसी १४’ चा हा प्रोमो सध्या सगळीकडे तुफान व्हायरल होत आहे.

‘कौन बनेगा करोडपती’ (केबीसी) चा १४ वा सिझन सुप्रसिद्ध अभिनेते बिग बी अमिताभ बच्चन हे होस्ट करणार आहेत. खरे तर बिग बी अमिताभ बच्चन यांच्यामुळे हा शो आणखीनच खास बनतो. प्रेक्षक आपला वेळ राखीव ठेवून आवडीने हा शो बघतात. सध्या ‘केबीसी १४’ या शोची शूटिंग सुरू असून, नुकताच सोनी टीव्हीने या शोचा प्रोमो सोशल मीडियावर रिलीज केला आहे. प्रेक्षकांच्या ज्ञानात भर पाडण्याबरोबरच प्रेक्षकांच्या मनोरंजनाकडेही या शोमधे विशेष लक्ष दिले जाते. त्यामुळे लहानापासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकालाच हा शो आवडतो.

‘केबीसी १४’ चा प्रोमो नुकताच समोर आला आहे. या प्रोमोमध्ये बिग बी अमिताभ बच्चन खुर्चीवर बसलेले दिसत आहेत. त्यांच्यासोबत गुड्डी नावाची एक महिला बसलेली दिसते. हॉट सीटवर बसलेले अमिताभ बच्चन स्पर्धकाला एक खास प्रश्नही विचारताना दिसतात. ‘केबीसी १४’ या शोची ऑन एअर डेट अजूनही जाहीर झालेली नाही; पण हा शो जुलैच्या शेवटच्या आठवड्यात टीव्हीवर येण्याची शक्यता आहे. या शोचा प्रोमो सध्या सोशल मीडियावर सगळीकडे प्रचंड व्हायरल होत आहे.

Share