शेतकऱ्यांना दिवसा पूर्णवेळ वीज पुरवठा द्या – भुजबळ

नाशिक : सध्या पिक लागवडीची काम सुरू आहे. त्यांना पाणी पुरवठा करण्यासाठी पूर्णवेळ दिवसा वीज उपलब्ध करून द्यावी, त्यांचे विजेचे प्रश्न तात्काळ सोडविण्यात यावे, अशा सूचना राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते आ. छगन भुजबळ यांनी संबधित अधिकाऱ्यांना दिल्या.

मतदासंघांतील विविध विकास कामांचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. शेतकऱ्यांच्या असलेल्या विजेचे प्रश्न तातडीने सोडविण्यात यावेत. शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडण्यात येऊ नये, शेतकऱ्यांनी देखील शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन टप्याटप्याने बिल भरावे असे, भुजबळांनी सांगितले.

अतिक्रमण धारकांवर कारवाई करा
अतिक्रमण करून गावातील नागरिकांच्या विकास कामांना अडथळा निर्माण करत असतील तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशा सूचना त्यांनी यावेळी सबंधित पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

Share