हे भाज्यपाल मराठी माणसाच्या राशीला नकोत! – जितेंद्र आव्हाड

मुंबई : राज्यापल भगतसिंग कोश्यारी यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श होते. तर नितीन गडकरी हे सध्याचे आदर्श आहेत, असं विधान करून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वादाला फोडणी दिली आहे. यावर राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राज्यपालांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी ट्टिट मध्ये म्हणतात, थोड्या दिवसांपूर्वी स्वतः रस्त्यावर उतरून आंदोलन केलं होत की हे भाज्यपाल मराठी माणसाच्या राशीला नकोत! महात्मा फुले,छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल वाईट बोलले गेले. पुन्हा एकदा संपूर्ण देशाचे आदर्श आहेत अशा महाराजांबद्दल त्यांना जुने आदर्श म्हणून हिणवले. बस झाले आता बोचंक गुंडाळ!, असं ट्विट जितेंद्र आव्हाडांनी केलं आहे.

 

काय म्हणाले राज्यपाल?
तुम्हाला कुणी विचारलं की तुमचे हिरो कोण आहेत? तर बाहेर कुठे जायची गरज नाही. इथेच महाराष्ट्रात तुम्हाला ते मिळतील. शिवाजी तर जुन्या काळातले आहेत, मी नव्या युगाविषयी बोलतोय. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपासून ते नितीन गडकरींपर्यंत तुम्हाला तुमचे आदर्श इथेच मिळतील, असं कोश्यारी म्हणाले.

औरंगागबाद येथे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि केद्रींय मंत्री नितीन गडकरी यांना मराठवाडा विद्यापीठाकडून डि.लिट पदवी देण्यात आली. यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी बोलत होते.

Share